मंगळवार, १२ जानेवारी, २०१०

लेट्स स्टार्ट...


नमस्कार मित्रांनो,
काय करता आहात, पेपर अगदी जवळ आलेत ना, थोडंसं तुमचं तापमान वाढलं असेलच, पण घाबरु नका....! असंसर्वांनाच होतं... ते कसं पेपर जवळ आले की थोडीशी भिती तर वाटतेच ना...??? ;)
ही भिती फार काळ टिकत नाही, तुम्ही म्हणाल हे कसं, पण हो हे खरं आहे. अगदी शाश्वत सत्य! हे बघा आपणआतापर्यंत किती परिक्षा दिल्या आहेत? मोजता येत नाहीत ना...? आतापर्यंत घाबरलो नाही, मग आता काघाबरायंच?
मग चला तर परत एकदा सज्ज होऊ नविन परिक्षेसाठी.....!

मित्रांनो,
मला
माहीत आहे या काळात आपल्याला योग्य मार्गदर्शनाची खुप आवश्यकता असते, पण योग्य मार्गदर्शनमिळणं खुप कठीण आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण विचार करा की, तुम्ही तुमचा निकाल कधी तरीइंटरनेटवर बघीतलाच असेल किंवा कधीतरी ऑनलाईन फॉर्म भरलाच असेल, तेव्हा तुमच्या लक्षात आले असेलकी, आपल्याला नेटवर जे शोधायचं असतं ते मिळतच नाही आणि मिळालं पण तर त्यासाठी खुप वेळ शोधावंलागतं आणि एवढं करुन जर आपली इंग्रजी जर कच्ची असेल तर मग लक्षात येणं खुपचं अवघड.....! ;) असंचआमच्या सोबत घडलं. जेव्हा आम्ही इंजिनिअरिंगचे फॉर्म भरायला गेलो तेव्हा आमची किती आणि कशी ताराबंळउडाली विचारू नका, पण आम्ही तेव्हाच ठरवलं की आम्ही यावर लवकरच उपाय काढू आणि आज आम्ही तुम्हालामदत करण्यासाठी पुर्णपणे तयार आहोत. आम्हाला याचा खुप खेद आहे की यासाठी आम्हाला पूर्ण दोन वर्ष लागली. असो.

आशा आहे की या संस्थळावरील माहिती तुम्हाला उपयोगी पडेल.

धन्यवाद...

- दिपक तेलंग्रे

1 टिप्पणी(ण्या):

RAHUL म्हणाले...

12 TH AAHE AATA AABHYSACHE NIYOJAN KASE KARU

टिप्पणी पोस्ट करा