बुधवार, १३ जानेवारी, २०१०

बारावीच्या परिक्षेसाठी पूर्व-तयारी


नमस्कार मित्रांनो,
 कसा काय चालू आहे तुमचा आभ्यास, काय म्हणतात तुमच्या परिक्षा, अगदी तोंडावर आल्यात. थोडयाच दिवसात तुम्हाला तुमच्या पराक्रमाचे शिखर गाठायचे आहे आणि परत एकदा नवीन पराक्रमासाठी झटायचे आहे, म्हणजेच.......
अगदी बरोबर ......मी तेच म्हणतोय ,सुरवातीला बारावी बोर्ड आणि नंतर MHT-CET (सामायिक प्रवेश परिक्षा).... तुम्ही घेतलेल्या दोन वर्षांच्या परिश्रमानंतर तुम्हाला लढण्याची एक संधी दिली जाते आणि त्या संधीचं सोनं जर नाही करता आलं तर..... रटून-रटून, घासून-घासून बारा महिने सहा विषय घासले जातात आणि शेवटी त्यांच्या परिक्षेतच गोंधळ उडतो आणि मग तो गोंधळ वाढतच जातो. अगदी चक्रवाढ व्याजासारखा...! म्हणजेच व्याजावर व्याज, आणि मुद्दलची दुप्पट कधी होते, कळतच नाही.....! ;) मग स्वतःच आपण स्वतःला गुरफटून टाकतो. शेवटी निकालात आपल्या हातात मिळते फक्त निराशा.... आणि तीच निराशा आपल्याला पुढे आयुष्यभर निराश करते.

पण घाबरू नका, विचार करा. जर आपण आपल्या व्याजाची परतफेड वेळेवर केली तर ती अगदी वेळेवर परत करता येईल. ते पण अगदी सोप्या पद्धतीने....! ;) आणि कळणारही नाही... की आपण केव्हा अगदी यशाच्या शिखरावर पोहोचलेलो असू... पण हे यश आपल्यासाठी आहे तरी काय?? अगदी लहानपणी बोलण्यापासून तर मरणाच्या दारात उभे राहण्यापर्यंत आपल्याला यश मिळते कितीवेळा आणि अपयश किती वेळा येतात, प्रत्येक जण हेच मोजण्यात आपला वेळ खर्ची करतो. पण जर आपण आपला वेळ यातच खर्ची केला तर आपल्याला परत त्याच अपयशाला पुन्हा-पुन्हा भेटावे लागेल, म्हणून यशाचे मित्र बनायचे असेल तर सुरूवातीला वेळेला सोबती बनवा आणि मग बघा तर तुमचा हा मार्ग किती आणि कसा सोपा बनतो ते....

विचार करा, तुमचा बारावीचा अभ्यास केव्हा सुरू झाला. तुम्ही त्याच्यासोबत कसे भेटता, म्हणजेच, समजा जर तुमच्या डोक्यावर बंदूक ठेवली आणि तुम्हाला एखादं अवघड काम करायला दिलं तर तुम्ही काय कराल??? घाई-घाईत त्याला संपवण्यासाठी चुका कराल. हमखास तुमच्या चुका वाढतील आणि तुमच्या डोक्यावरचा ताण किती असेल? पण हेच काम जर तुम्ही जरासं वेगळं केलं, म्हणजेच जसं तुम्ही तुमच्या मित्रांना भेटता-बोलता, तसं केलं तर..... मला खात्री आहे, तुम्हाला ते आठवणार पण नाही आणि कधी पुर्ण झालंय हे पुर्ण झाल्यावरच कळेल... म्हणून हे तुम्हालाच ठरवावे लागेल की अभ्यास तुम्हाला एक छंद, आनंद म्हणून घ्यायचा आहे की एक जबरदस्ती अंगावर ओढावलेले संकट म्हणून.....

मित्रांनो, बारावी म्हणजे एक टर्निंग पॉईंट म्हणून ओळखला जातो. जो एकदा येथे सावरतो, तो सावरला. पण आजकाल आपण साधारणपणे बारावी बोर्ड परिक्षेकडे दुर्लक्ष करतो आणि फक्त आपला कल हा “सामाईक प्रवेश परिक्षा (MHT-CET)”कडे जास्त असतो. पण जर तुम्ही बारावी बोर्डचा अभ्यास पुर्ण केला तर तुम्हाला सामाईक प्रवेश परिक्षेत यश सहजतेने मिळते. म्हणजेच, सांगायचे हेच की, तुमच्या मनावर असं बिंबवलं जातं की, सीईटी ही खुप अवघड परिक्षा असते, ती पास करण्यासाठी किंवा गुणवत्ता मिळवण्यासाठी वेगळा अभ्यास करावा लागतो, पण हे पुर्णपणे खोटं आहे. कारण सीईटी ही खुप सोपी आहे आणि सरळसुद्धा..... फक्त ते ठरवल्या जातं तुमच्या अभ्यास करण्याच्या पद्धतीवर, जर तुम्ही तिला अवघड म्हणून घ्याल, तर तुम्हाला ती अवघडच वाटेल आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही जर बारावी बोर्डचा अभासक्रम पुर्ण केला तर तुम्हाला सीईटी मध्ये अगदी सोप्या पद्धतीने गुण मिळवता येतात, त्यासाठी कोणताच अतिरिक्त ताण घ्यायचं काहीच कारण नाही.... फक्त तुम्हाला एवढंच करावं लागेल की, अभ्यासक्रम पुर्ण करावा आणि लहानातील-लहान गोष्टीकडे सुद्धा बारकाईने लक्ष द्या, जेणेकरून तुमचा गोंधळ कमी होईल. दुसरी अजुन एक महत्वाची बाब सांगायची म्हणजे, सीईटीचे प्रश्न सोडवताना लागणारा वेळ, प्रत्येकांना असं वाटतं की १०० प्रश्न सोडवण्यासाठी ९० मिनिटे खुप कमी आहेत. पण तसं कधीच वाटू देऊ नका, कारण १०० प्रश्न सोडवण्यासाठी ९० मिनिटे खुप आहेत आंणि शेवटी पेपर पुर्ण सोडवल्यावर तुम्ही सांगाल की माझ्याकडे अजुन वेळ शिल्लक होता. फक्त आपल्याला आपला वेळ वाचवण्यासाठी आता सरावाला जास्त वेळ द्यावा लागेल. हे सर्व सीईटीबद्दल मार्गदर्शन आम्ही तुम्हाला सीईटीच्या काळात करणारच आहोत, पण आता सध्यातरी तुम्ही तुमचं लक्ष बारावी बोर्डकडे केंद्रित करा म्हणजे तुम्हाला हा अभ्यासक्रम परत-परत घासावा लागणार नाही.... या गोष्टींचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल, एकवेळ बघून घ्या.


- दिपक तेलंग्रे

1 टिप्पणी(ण्या):

vikas Dhobe म्हणाले...

CETचे स्वरूप कसे असते हे चांगल्या प्रकारे समजून सांगितले Thank you very much

टिप्पणी पोस्ट करा