मानसिकता नेमकं आहे काय आणि या गोष्टीचा आपल्या अभ्यासाशी काय संबंध आहे? असा प्रश्न कदाचित तुम्हाला पडला असेलही... तुमचा तो प्रश्न अगदी बरोबर आहे. याचे उत्तर मी तुम्हाला अगदी थोडक्यात समजावतो. समजा, तुम्ही एखाद्या मोठ्या आनंद सोहळ्यात आहात. सर्वजण अगदी आनंदाने मजा कराताहेत. आणि तुम्ही तुमच्या मित्र/मैत्रिणीची वाट बघता आहात. पण तो/ती आलीच नाही, तर काय घडतं...? तुम्हाला मोठ्या आनंद सोहळ्यातपण नकोसं वाटतं. तिथुन पळून जावसं वाटतं... खरंय ना.... ;) हे असं का घडतं...? तर तुमच्या मानसिकतेमुळे तुमची स्थिती अशी बनते की, तुम्ही तुमच्या मित्र किंवा मैत्रिणीशिवाय आनंदच लुटू शकत नाही आणि शेवटी तीच तुमची मानसिकता तुमच्यापासून सर्व आनंद लुटते....! म्हणून कोणतेही काम करण्यापूर्वी आपल्याला आपली मानसिकता बनवावी लागते.
अजुन एक दैनंदिन जीवनातील उदाहरण सांगतो. आपल्या परिक्षा जवळ आल्या की आपल्याला सर्वच जण सांगतात, अभ्यास कर.... आई.... अभ्यास कर....., बाबा..... अभ्यास कर....., ताई-दादा.....अभ्यास कर...... आणि जर आपली तेव्हा मानसिकता नसेल, तर आपण दबावामुळे पुस्तक तर हातात घेतो पण ते फक्त हातातच राहते, डोक्यात मात्र शुन्य.....! ;) असं का घडतं....? हीच आपली मानसिकता असते.
म्हणून सर्वप्रथम आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, तुमची मानसिकता बनवा की तुम्हाला परिक्षा द्यायची आणि अगदी चांगल्याप्रकारे गुण मिळवायचे आहेत. तुमच्यासमोर येणारा प्रत्येक पेपर हा अगदी सोपाच असणार आहे आणि मला तो पुर्ण सोडवायचा आहे, त्यासाठी मी माझा अभ्यास वेळेच्या पुर्वी पुर्ण करून प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी सज्ज आहे. बघा तर मग तुमचा अभ्यास केव्हाही आणि कधीही कसा मजेत पुर्ण होतो ते......
बुधवार, १३ जानेवारी, २०१०
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा